देशाच्या शैक्षणिक नकाशात प्रमुख स्थान असलेल्या नाशिकच्या संदीप फाउंडेशनच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला असून संदीप फाउंडेशनतर्फे शैक्षणिक वर्ष 2026 -27 पासून बीएससी अग्रिकल्चर [ अॉनर्स ] हा कृषी पदवी अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी दिली. पहिल्या वर्षी या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्स या कृषी महाविद्यालयाला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेद्वारे मान्यता मिळाली असून हा अभ्यासक्रम राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील बहुसंख्य नागरिकांची उपजीविका ही कृषी आणि त्यावर आधारित कृषीएतर उद्योगांवर आधारित आहे. कृषी क्षेत्रापुढील आव्हाने वाढती आहेत. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण देताना नवीन तंत्रज्ञान ,संशोधन तसेच कृषीपूरक उद्योग याचे देखील शिक्षण महाविद्यालयात देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले. नाशिक जिल्हा हा कृषी उत्पादनांमध्ये अग्रेसर असून द्राक्षे, भाजीपाला फळफळावळ यांचे चांगले उत्पादन नाशिक मध्ये होत. – डॉ. संदीप झा
2007 मध्ये स्थापना झालेल्या संदीप फाउंडेशनतर्फे अभियांत्रिकी [पदवी व पदविका ], व्यवस्थापन ,फार्मसी, जुनियर कॉलेज यांचे शिक्षण दिले जात आहे. संदीप फाऊंडेशनचे देशभरात दोन कॅम्पस असून या मध्ये महाराष्ट्रातील नाशिक व बिहार मधील सीजोल येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी संदीप फाउंडेशनमधील विविध महाविद्यालयांना अनेक पुरस्कार व मानांकने मिळाली आहेत. ह्या मानांकनामध्ये सिंगापूरचा नामांकित बर्ग (BERG) पुरस्कार, कॉम्प्युटर सोसायटी तसेच सिलिकॉन इंडिया , ETNOW, महाराष्ट्र तंत्र शिक्षण महामंडळ तसेच ‘द वीक’ मासिकातर्फे विविध पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना देश विदेशातील संधी मिळावी यासाठी अनेक नामांकित संस्थांशी संदीप फाउंडेशनने करार देखील केले आहेत. संदीप फाउंडेशन संचलित महाविद्यालयतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.- डॉ. संदीप झा
संदीप फाउंडेशन मधील अभ्यासक्रम हे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत.तसेच एआईसीटीई, दिल्ली, यांच्या द्वारा अनुमोदित आहेत.तसेच संदीप पाॅलिटेक्निक हे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी (एमएसबीटीई) संलग्न आहे.
